गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (13:43 IST)

नोएडाः मेट्रो दवाखान्यात आग, चेअरमेनने षडयंत्र केल्याची शंका वर्तवली

नोएडाचे सेक्टर 12 मेट्रो हार्ट हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याने गोंधळ उडाला आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि दमकल विभागाच्या गाड्या तेथे पोहोचल्या आहे आणि बचाव कार्य सुरू केले आहे. आतापर्यंत किमान 30-40 लोकांना दवाखान्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतर दवाखान्यातील चेअरमेन डॉ. पुरुषोत्तम लाल यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले की ह्या आग लागण्यामागे कोणाचे षडयंत्र आहे अशी शंका दाखवली आहे. त्यांनी सांगितले की सर्व मरीज सुरक्षित आहे. ही घटना घडली तेव्हा ते दवाखान्यातच होते.  
 
अद्याप हे कळले नाही की आग कशी लागली आणि किती नुकसान झाले आहे. आतापर्यंत आगीवर नियंत्रण करता आलेले नाही. या वेळेस सर्व रुग्णांना बाहेर सुरक्षित काढण्याचे काम सुरू आहे. ही आग दवाखान्यातील तिसर्‍या आणि चवथ्या मालावर लागली आहे. 
 
आग लागली तेव्हा बर्‍याच रुग्णांचे ऑपरेशन देखील सुरू होते पण दुर्घटनेनंतर त्यांना बाहेर काढावे लागले आहे. जे रुग्ण गंभीर आहे त्यांना दुसर्‍या दवाखान्यात हालवण्यात आले आहे. अजून ही बरेच मरीज दवाखान्यात अडकलेले आहे.