सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2024 (14:18 IST)

दिल्लीमध्ये आई-7 हॉस्पिटलला लागली आग

fire
राजधानी दिल्लीमध्ये लाजपत नगर परिसरात लहान मुलांच्या हॉस्पिटलला आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या परिसरात आई-7 हॉस्पिटलला अचानक आग लागली. यानंतर लागलेली भीषण आग विझवण्यासाठी दिल्ली फायर ब्रिगेडला बोलवण्यात आले. सूचना मिळताच घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 16 गाड्या पोहचल्या. लागलेली आग एवढी भीषण होती की, इमारतीमधून काळा धूर बाहेर निघताना दिसला.  अधिकारींनी दिलेल्या माहितीमध्ये 12 मुलांना बाहेर काढण्यात यश आले.