रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 (12:41 IST)

धक्कादायक : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल व्हॅनवर गोळीबार

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून धक्कदायक बातमी समोर आली आहे. स्कूल व्हॅनवर गोळीबार करण्यात आला असून दगडफेक देखील करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात तरुणांनी स्कूल व्हॅनवर हल्ला करून दहशत पसरवली. तसेच व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांसह एकूण 28 विद्यार्थी होते. अचानक झालेल्या गोळीबारामुळे आणि दगडफेकीमुळे मुले घाबरली आरडाओरडा केला.   
 
तसेच सांगण्यात येत आहे की, चालकाने हुशारी आणि परिस्थीचे गांभीर्य पाहता व्हॅनचा वेग वाढवला आणि मुलांना सुखरूप शाळेपर्यंत पोहचवले. ज्यामुळे सुदैवाने एकाही मुलाला दुखापत झाली नाही. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्यानंतर चालकाने सांगितले की तो मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना तीन दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्याची व्हॅन थांबवली आणि गोळीबार सुरू केला. चालकाने लगेच मुलांना सीटखाली लपायला सांगितले आणि न थांबता व्हॅन जलद गतीने पळवली. तरी हल्लेखोरांनी गोळीबार आणि दगडफेक सुरूच ठेवली, परंतु चालकाने व्हॅन सुरक्षितपणे शाळेपर्यंत नेली. व नंतर थेट पोलीस स्टेशनमध्ये नेली. 
 
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा तपास सुरू केला. 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघाताबाबत हल्लेखोर आणि चालक यांच्यात वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, ज्यामुळे हा हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी ही व्हॅन ताब्यात घेतली असून परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहे. या घटनेने मुलांचे पालकही चिंतेत पडले आहे. 

Edited By- Dhanashri Naik