बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2024 (18:07 IST)

कोचिंग सेंटर अपघात प्रकरणी तळघर मालकासह पाच जणांना अटक

arrest
राजेंद्र नगर कोचिंग अपघात प्रकरणात अजून पाच जणांना अटक करण्यात आली असून आता एकूण सात जणांना अटक केलं आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. 
 
जुने राजेंद्र नगर येथे यूपीएससी कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचून त्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयाने कोचिंगचे मालक आणि कोऑर्डिनेटरला अटक केली असून दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
 
'तळघर मालक आणि वाहन चालवणाऱ्या एका व्यक्तीसह आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनन्तर इतर विध्यार्थी आक्रमक झाले असून पोलिसांनी दोलक विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आणि जाम निर्माण न करण्याचे आवाहन केले आहे. 
 
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या राजेंद्र नगर प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या ड्रायव्हरला निष्काळजीपणाचा दोषी ठरविण्यात आला आहे. तो गाडी वेगाने चालवत होता, त्यामुळे कोचिंग सेंटरचे गेट तुटले.आणि पाणी तळघरात शिरले. 
Edited By- Priya Dixit