मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जिथे माकडाने फडकवला तिरंगा

15 ऑगस्टच्या दिवशी 71व्या स्वातंत्र्य दिन प्रसंगी देश भरात शासकीय संस्था आणि इतर संस्थानांवर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. परंतू अंबाला येथील एका शासकीय शाळेत काही विशेष प्रकारे ध्वज फडकवण्यात आला. हा प्रकार जाणून घेतल्यावर आपल्याला आश्चर्यच वाटेल. कारण अंबाला येथे शासकीय शाळेत कोणी माणसाने नव्हे तर एका माकडाने हे काम केले.
 
हो खरंच! अंबालाच्या शासकीय शाळेत प्रिंसिपल किंवा प्रमुख पाहुणे यांच्याऐवजी एका माकडाने तिरंगा ध्वज फडकवला. या दरम्यान शाळेतील प्रांगणात सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बघत बसले आणि शाळेच्या गच्चीवर राष्ट्रध्वजाच्या दंड्यावर लटकून एका माकडाने 
 
तिरंगा ध्वज फडकवून दिला. या दरम्यान त्या माकडाचा एक साथीदारही तिथे बसला होता. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे हेही सांगणे जरा अवघडच आहे पण आपणही बघा या माकडाची करामत -