शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (09:28 IST)

अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, 15 जणांचा मृत्यू;

मेघालयातील पश्चिम गारो हिल्स आणि दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. तसेच, राज्याचे शिक्षण मंत्री रक्माक ए संगमा आणि आमदार सेंगचिम एन संगमा आणि कार्तुश माराक यांनी हातिसिया सोंगमा येथील भूस्खलनग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
 
मिळालेल्या माहितीनुसार मेघालयातील दक्षिण गारो हिल्स भागात रविवारी आलेल्या पुरामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांतील पुरामुळे मृतांची एकूण संख्या 15 वर पोहोचली आहे.
 
तसेच पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील दिमापारा पुलाखाली रस्ता ओलांडताना वडील आणि मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर पूर्व गारो हिल्समधील गोंगडोप गावात भूस्खलनात एक महिला आणि तिची मुलगी मरण पावली, अशी माहिती अधिकारींनी दिली.  
 
तर पूर्व गारो हिल्स जिल्ह्यातील सोंगसाक राखीव जंगलात वाहनावर झाड पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. शनिवारी पुरामुळे झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातील सात जणांसह दहा जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री कोनराडचे संगमा यांनीही मृतांच्या नातेवाईकांना एक्स-ग्रेशिया रक्कम देण्याचे आदेश दिले आहे.