1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (14:37 IST)

रेल्वेत बाळासह प्रवास करण्याची अडचण दूर करण्यासाठी ‘फोल्डेबल बेबी बर्थ’चे संशोधन, पेटंटही मिळालं

रेल्वेमध्ये बाळासोबत प्रवास करताना पत्नीला आलेल्या अडचणीवर तोडगा काढताना एकाने एक संशोधन केलं आहे. संशोधकाने फोल्डेबल बेबी बर्थचा शोध लावला असून नंदुरबारच्या या शिक्षकाच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. प्राध्यापक नितीन देवरे असं या संशोधकाचं नाव आहे. विशेष म्हणजे संशोधकांनी फोल्डेबल बेबी बर्थ हे संशोधन भारतीय रेल्वेला विनामूल्य हस्तांतरित करण्याची तयारी दर्शवली आहे.
 
रेल्वेतील डब्यात आई व बाळा दोघांना रात्रभर छोट्याशा जागेत अडखळत झोपावे लागते म्हणून “फोल्डेबल बेबी बर्थ’ हा उपाय ठरू शोधण्यात आला. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे नितीन देवरे व त्यांच्या पत्नी हर्षाली देवरे यांनी यासंबंधीचे पेटंट फाईल केले. ही सुविधा रेल्वेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या बर्थमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नसल्याने कमी खर्चात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
 
रेल्वे प्रवासात लहान बाळ बर्थवरून खाली पडण्याची भीती असते. ही समस्या लक्षात घेऊन प्राध्यापक नितीन देवरे यांनी फोल्डेबल बेबी बर्थ तयार केला आहे. ज्याने मातांना प्रवासात निर्धास्त झोप घेता यावी. त्याची रचना अशी आहे की हा लोअर बर्थ लावता येणार आहे. आणि बेबी बर्थवर बाळाला झोपवता येणार आहे. त्यात बाळाच्या सुरक्षितेसाठी सेफ्टी बेल्ट लावण्यात आला आहे.
 
रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आणि राष्ट्रसेवा म्हणून ही सेवा भारतीय रेल्वेला मोफत हस्तांतरित करण्याचा निर्णय देवरे यांनी घेतला असून त्यासंदर्भात रेल्वेसोबत पत्रव्यवहार सुरु केला आहे. रेल्वेनेही त्यांचा संशोधनाची दखल घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
 
संशोधक नितीन देवरे व हर्षाली देवरे यांचे हे पेटंट 26 नोव्हेंबर 2021 रोजी इंडियन पेटंट जर्नलच्या आवृत्तीत प्रकाशित झाले आहे.  ‘फोल्डेबल बेबी बर्थ’ हा 76 सेमी बाय 23 सेमी आकाराचा बर्थ आहे. जो 10-12 किलो वजन पेलू शकतो. यामध्ये बाळ झोपेत बर्थवरून खाली पडू नये म्हणून बेल्ट देखील आहे. त्याचा कोचमधील इतर प्रवाशांना कुठलाच त्रास होणार नाही, अशी शक्कल लावली गेली आहे.  या प्रोजेक्टमध्ये कंपोझिट लॉकिंग यंत्रणा वापरली आहे. विशेष म्हणजे या बर्थचा वापर प्रौढ व्यक्तींना मेडिसिन किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी देखील करता होऊ शकतो.