गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (11:40 IST)

ZP Election Result: काँग्रेसच्या हेमलता शितोळे 1923 मतांनी विजयी

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी राज्यात सहा जिल्हा परिषदात पोटनिवडणूक झाली. आज त्याचा निकाल लागणार आहे. नागपूर, वाशिम, धुळे, अकोला, नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांतील 84 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पहिला निकाल आता हाती आला आहे. नंदुरबारमध्ये काँग्रेसने खाते उघडले असून म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी झाल्या आहेत.
 
हेमलता शितोळे यांनी भाजप उमेदवार शशिकांत पाटील (BJP Shashikant Patil)यांचा पराभव केला आहे. हेमलता शितोळे यांनी 1923 मतांनी विजय मिळवला आहे.
 
पोटनिवडणुकीसाठी सुमारे 63 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं सहा जिल्हा परिषदांमध्ये 229 जागा रिक्त झाल्यात. रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येत आहेत. पोटनिवडणुकांच्या निकालांवर नागपूर, अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदांच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे. तर पालघरमधील निकालाने राजकीय चित्र मात्र बदलणार नाही.