गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (18:26 IST)

पैशेअभावी आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन मुलगा 50 किमी चालला

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका मुलाला पैशेअभावी आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन 50 किमी चालावे लागले.मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका चालक निश्चित शुल्काच्या जवळपास तिप्पट रकमेची मागणी करत होते. 
 
जलपायगुडी जिल्हा केके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून सकाळी साडेदहाच्या सुमारास आई गमावून बसलेल्या मुलाने रुग्णवाहिका चालकाशीआईचा मृतदेह नेण्यासाठी बोलणी करत होता. मात्र चालकांकडून त्याच्याकडून तिप्पटीने भाडे घेतले जात होते. त्याच्या कडे एवढे पैसे नव्हते.त्याने वडिलांसोबत पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे कांती गावात आईचा मृतदेह खांद्यावर ठेवून पायी चालायला सुरु केले. 
 
आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन मुलगा सुमारे 50 किलोमीटर चालत होता. इंडिया टुडेशी बोलताना मृत महिलेचा मुलगा जय कृष्ण दिवाण म्हणाला, “मी माझ्या आईला रुग्णालयात घेऊन आलो तेव्हा रुग्णवाहिकेने सुमारे 900 रुपये घेतले.  मात्र, यावेळी रुग्णवाहिका चालकाने मृतदेह वाहून नेण्यासाठी 3000 रुपयांची मागणी केली. मी त्याला अजून थोडे पैसे घे म्हणून सांगितले, पण तो मान्य झाला नाही. 
 
मी असहाय होतो आणि माझ्या आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन जावे लागले. या घटनेने वैद्यकीय उपकरणांच्या वापराबाबत रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
Edited By - Priya Dixit