गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2023 (07:49 IST)

अडीच वर्षांत राज्यासाठी कधीच घराबाहेर न पडणार्‍यांना योगीजींचा रोड शो काय समजणार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमधील गुंतवणूक वाढीसंदर्भात योगी आदित्यनाथ यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई दौऱ्यावर असताना योगी आदित्यनाथ अनेक उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. यावरून विरोधकांकडून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा आणि रोड शोवरून निशाणा साधला. पण भाजपाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
 
"अडीच वर्षांत राज्यासाठी कधीच घराबाहेर न पडणार्‍यांना योगीजींचा रोड शो काय समजणार? उरली सुरली शिवसेनाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणतात, योगींचा रोड शो कशासाठी? आता यांना काय समजणार रोड शो? जे अडीच वर्षांत राज्यासाठी कधीच घराबाहेर पडले नाहीत. यांच्यासाठी एकच रोड शो होता, तो म्हणजे वर्षा ते मातोश्री, तोही कोरोना झालेला असताना आणि मुख्यमंत्रीपद गेल्यावर. घरात बसणारे बाहेर फिरणार्‍यांवर टीका करतात, तेव्हा हसावे की रडावे कळत नाही. क्या तुम भी संजुभाऊ?" अशा शब्दांत भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना सुनावलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor