रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (21:31 IST)

बनावट प्रमाणपत्राद्वारे ओमिक्रॉन रुग्ण देशाबाहेर पाठविण्याच्या प्रकरणी चार आरोपीना अटक

बेंगळुरू पोलिसांनी सोमवारी एका 66 वर्षीय दक्षिण आफ्रिकन व्यक्तीला, जे देशातील पहिले ओमिक्रॉन रुग्ण होते, बनावट कोरोना नकारात्मक प्रमाणपत्राद्वारे देशाबाहेर जाण्यास मदत करणाऱ्या चार जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन बेंगळुरू येथील एका खासगी लॅबचे कर्मचारी आहेत, तर दोघे दक्षिण आफ्रिकेतील संचालक असलेल्या एका खासगी कंपनीचे कर्मचारी आहेत. 
बनावट प्रमाणपत्राच्या आधारे रुग्ण देश सोडून गेल्याची माहिती सरकारने दिल्यानंतर पोलिसांनी 5 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानतळ रोड येथील लॅबच्या कर्मचाऱ्यांना बनावट चाचणी निकाल तयार केल्याबद्दल अटक करण्यात आली होती, तर 66 वर्षीय रुग्णाच्या वतीने प्रमाणपत्रे तयार केल्याबद्दल दोघांना अटक करण्यात आली होती.
डीसीपी सेंट्रल एमएन अनुचेथ म्हणाले, “आम्ही चार जणांना ताब्यात घेतले असून अधिक चौकशी करत आहोत. हे बनावट प्रमाणपत्रे बनवण्याच्या मोठ्या रॅकेटचा भाग आहेत की नाही हे तपासानंतर कळेल.” ही व्यक्ती 20 नोव्हेंबरला बेंगळुरूला पोहोचली आणि त्याचा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याने सांगरीला हॉटेलमध्ये स्वतःला आयसोलेट केले. फॉलो अप म्हणून, सरकारी डॉक्टर त्यांना भेटायला आले तेव्हा त्यांच्यात कोणतीही लक्षणे नसल्याचे आढळून आले
त्याचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला कारण तो धोका असलेल्या देशातून आला होता. एका दिवसानंतर 23 नोव्हेंबर रोजी त्यांची खासगी लॅबमध्ये चाचणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. 27 नोव्हेंबरला तो अधिकाऱ्यांना न कळवता देश सोडून गेला. दक्षिण आफ्रिकेतुन आलेल्या त्या प्रवाशाचे शोध घेण्याचे काम देण्यात आलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 27 नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाने पोलिसांना रुग्णाचा शोध घेण्यास सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही त्या रात्री त्याला ट्रेस केले  आणि त्यावेळी त्याच्या लोकेशननुसार दुबईला जाण्यासाठी फ्लाइट घेतली होती. 2 डिसेंबर रोजी, आरोग्य विभागाने त्याचे वर्णन देशातील पहिले ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण  म्हणून केले.