1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (16:52 IST)

धक्कादायक ! गेम साठी लहान भावाचा खून केला

कोरोनामुळे शाळा बंद होत्या. मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु होते. पालकांनी मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल घेऊन दिले. ,मुलांचे शिक्षण तर सुरूच होते .पण स्वतंत्र मोबाईल मिळाल्यामुळे मुलांना गेमचे व्यसन देखील लागले. गेमच्या व्यसनापायी एका 16 वर्षाच्या मुलाने आपल्या 12 वर्षाच्या चुलत भावाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने भावाचे प्रेत जमिनीत पुरले. आणि आसाम मध्ये राहणाऱ्या काकांकडून फेक आयडी वरून मेसेज करून खंडणी म्हणून पैसे ही मागत होता.  ही धक्कादायक घटना आहे नागोरच्या लाडनू ची. 
झाले असे की 8 डिसेंबर रोजी धुंडी गावातून प्रवीण शर्मा वय वर्ष 12 नावाचा मुलगा आपल्या घरातून आईचा मोबाईल घेऊन गायब झाला .त्याचा काकाने पोलिसांना ही माहिती आणि त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यांनी पोलीसांना प्रवीणला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय असल्याचे सांगितले. दरम्यान आसाम मध्ये असलेल्या प्रवीणच्या काकांना इंस्टाग्राम वरून मेसेज आला की प्रवीण सुरक्षित आहे आणि तो दिल्लीत आहे. त्याला जिवंत बघायचे असल्यास 5 लाख रुपये खंडणी म्हणून द्या. या बाबतीत प्रवीणच्या काकांनी पोलीसांना कळवलं .
पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने मेसेज कुठून आला ती लोकेशन शोधून काढल्यावर त्यांना मोबाईल चे लोकेशन धुंडी गावात सापडले. त्यांना प्रवीणच्या चुलत भावावर संशय आला आणि त्यांनी त्याला विचारपूस केली असता. धक्कादायक माहिती मिळाली. त्याने सांगितले की ,मी मोबाईल मध्ये ऑनलाईन गेम खेळतो आणि त्या,मुळे मी कर्जबाजारी झालो आहे. मला पैशाची गरज होती. प्रवीण देखील माझ्या सोबत खेळत असे. मी त्याला तलावा जवळ गळा आवळून मारून त्याचे मृतदेह पुरून दिले आणि पैशांसाठी काकांकडून खंडणी मागितली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुरलेले मृतदेह काढून शव विच्छेदनासाठी पाठवले आहे.