बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (14:51 IST)

एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू

एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटनाला घडली आहे.  ग्रेटर नोएडा पश्चिम येथील तुस्याना गावात एकाच खोलीत भाऊ चंद्रेश आणि राजेश, बहीण बबली आणि चंद्रेशची पत्नी निशा यांचे मृतदेह सापडले. प्राथमिक तपासानंतर चौघांचाही मृत्यू गुदमरल्याने झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळी खोलीचा दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. आतून गॅसचा वास येत होता, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे पोलिसांनी सांगितले.
 
माहितीनुसार, हाथरसच्या सराय सिकंदराव येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील चार सदस्य इकोटेक-3 पोलिस स्टेशन हद्दीतील तुस्याना गावातील रहिवासी लकीराम यांच्या घरी राहत होते. चंद्रेश आणि राजेश रस्त्यावर पराठे विकायचे. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चौघांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी घरमालकाला दिली. खोलीचा दरवाजा आतून बंद होता. काहीतरी अनुचित प्रकार झाल्याचा संशय आल्याने घरमालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून चौघांचेही मृतदेह बाहेर काढले.

खोलीत स्वयंपाकघरातील गॅस शेगडीवर मोठ्या भांड्यात बटाटे ठेवले होते. जे जळून राख झाले. कुटुंबीयांनी पराठे बनवण्यासाठी बटाटे उकळण्यासाठी ठेवले असावेत, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. खोलीचा आकार खूपच लहान होता आणि वायू आणि हवा बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. चौघांचाही मृत्यू गुदमरल्याने झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घरमालकाच्या म्हणण्यानुसार, चारही जण गुरुवारी रात्री झोपले होते. चौघेही अडीच महिन्यांपूर्वीच त्याच्या घरी राहायला आले होते.

Edited by - Priya Dixit