1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Four-year-old boy dies after being attacked by bees while returning home from school

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

child death
उत्तरकाशी जिल्ह्यातील मांडिया गावात शाळेतून घरी परतणाऱ्या भाऊ आणि बहिणीवर मधमाशीने हल्ला केला या मध्ये चार वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यु झाला.तर मुलाच्या बहिणीची प्रकृति चिंताजनक आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंडिया गावात राहणाऱ्या राजकुमार यांची मुलगी रिया (12) ही जवळच्याच प्राथमिक शाळेत मंडियामध्ये शिकते. शनिवारी मुलीसोबत तिच्या 4 वर्षाच्या भावाला देखील सोडले होते. शाळेतून घरी परत येतांना त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला आणि जोरदार चावा घेतला.

या हल्ल्यामुळे मुलांनी आरडाओरड केला. त्यांना ओरड़ताना पाहून लोक धावत आले आणि त्यांनी ही माहिती कुटुम्बियाना दिली. दोघांना तातडीने रुग्णालयात दखल करण्यात आले असून डॉक्टरनी मुलाला मृत घोषित केले. तर मुलीची प्रकृति चिंताजनक आहे. 

शाळेच्या जवळच्या झाडावर मधमाश्यांचे पोळे आहे कोणीतरी त्याला मरले असून मधमाश्यांनी मुलांवर हल्ला केला आणि या हल्ल्यात एकाचा मृत्यु झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
Edited By - Priya Dixit 
 
पुढील लेख
निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली उद्धव ठाकरेंची बॅग, मोदींची तपासणार का म्हणाले