शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (16:37 IST)

दोन लग्नांवरून नववधूचा पोलिसांसमोर धिंगाणा

उत्तरप्रदेशातील हमीरपूर येथेएका नववधूने पोलीस ठाण्यात जाऊन चांगलाच गोंधळ घातला. महिला इतकी रागात होती की तिला हाताळताना पोलिसांना घाम फुटला.महिलेने सीईओ कार्यालयात जाऊन खुर्च्या तोडल्या ,मोबाईल फोडला, नंतर  आरडाओरड केली. दोन महिला हवालदाराने तिला पकडण्याच्या प्रयत्न केला. मात्र महिलेचा धिंगाणा सुरु होता. पोलिसांनी सांगितले की महिला मानसिक रुग्ण आहे. 
 
हे प्रकरण हमीरपुरातील आहे. जिल्ह्यातील राठ पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीतील बसेला गावातील रहिवासी असलेल्या अनिल शर्मा या तरुणाचे लग्न झाशी जिल्ह्यातील चिरगाव येथील तरुणीशी गेल्या वर्षी 22 फेब्रुवारी रोजी झाले होते. महिलेचे लग्नाच्या पूर्वीपासून एका तरुणाशी प्रेम संबंध आहे. लग्नानंतर तरुणी प्रियकराशी फोनवर बोलू लागली. तिचा प्रियकर ओराई जालौन येथे राहतो जो मागास जातीचा आहे. नातेवाइकांनी सांगितले की, लग्नानंतरही वधू आपल्या प्रियकरासह पळून जाण्यासाठी राठ नगरला फोनवर पोहोचली आणि पुष्पहार घेऊन कोतवाली गाठून गोंधळ घातला.मुलीने आधी सांगितले की तिला दोन लग्न करायचे आहे. तिला प्रियकराशी देखील लग्न करायचे आहे.तिला दोन महिला पोलिसांनी कसेबसे शांत केले आणि तिला तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींच्या स्वाधीन केली.  या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
Edited By - Priya Dixit