शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (09:27 IST)

ट्रेनमध्ये लावली आग, मृत्यू

train fire
केरळमधील कोझिकोडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी  रात्री उशरिा एका वेड्या प्रवाशाने इतर प्रवाशांना पेट्रोल शिंपडून पेटवून दिले. 
 
या घटनामुळे रेल्वेच्या बोगीमध्ये एकच गोंधळ उडाला असून घाईघाईत तिघांनी चालत्या ट्रेनमध्ये उड्या मारल्या. या घटनेत एका अर्भकासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण गंभीररीत्या भाजले आहेत.
 
पोलिसांना ट्रॅक्सजवळ एक बॅग सापडली, ज्यामध्ये पेट्रोलची बाटली आणि दोन मोबाईल फोन होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दहशतवादी अ‍ॅगल असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी तौफिक आणि रेहाना अशी दोघांची नावे आहेत.