1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 एप्रिल 2023 (13:06 IST)

ट्रक दुचाकीचा भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

In Gondia District  Four killed in a horrific accident involving a truck and two wheeler
ट्रक आणि दुचाकींचा भीषण अपघात झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे.समोरून येणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात चौघांचा मृत्त्यू झाला.आदित्य बिसेन(7) मोहित बिसेन (11) कुमेंद्र बिसेन(37) आर्वी कमलेश तुरकर(5) असे मयत झाल्याची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बिसेन कुटुंबीय जिल्ह्यातील पिंकेपार लग्नासाठी गेले होते लग्नावरून दुचाकीने परतताना ठाकणी भागवत टोला परिसरात समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघात दोन मुलांसह वडिलांचा मृत्यू झाला. अपघातांनंतर ट्रक चालक घटनस्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळतातच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.आदित्य मोहित आणि कुमेंद्र यांचा जागीच  मृत्यू झाला तर चिमुकली आर्वी गंभीर जखमी झाली तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस शोध करत आहे. चौघांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.    
 
Edited by - Priya Dixit