रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (16:25 IST)

धक्कादायक आठवर्षाच्या मुलीवर पाच अल्पवयीन मुलांचा बलात्कार

मोठी धक्का दायक गोष्ट समोर आली आहे. यामध्ये पुणे येथे कोंढवा येथे  आठ वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात विशेष म्हणजे हे सर्व आरोपी दोघेजण १० वर्षांचे असून एक मुलगा ६ तर एकजण ९ वर्षांचा तर एक जण १८ वर्षांचा आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.  दोन दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखत होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला. याबाबत अधिक चौकशी केली असता मुलीने सर्व प्रकार सांगितला. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. यामध्ये मुलीला हे मुले खेळायला चल म्हणून नेत होती आणि तिच्यावर अत्याचार करत होती.