शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सलग 36 तास झाला तिच्यावर बलात्कार!

बैतुर- सहा नराधमांनी मध्यप्रदेशात आदिवासी महिलेला ओलीस ठेवत आळीपाळी 36 तास सामूहिक बलात्कार केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. बैतुर जिल्ह्यातील या विवाहित महिलेचे त्या नराधमांनी अपहरण करत अत्याचार केला.
 
सहा जणांच्या अत्याचाराची बळी ठरलेल्या त्या विवाहित महिलेला अत्याचारानंतर 13 किलोमीटर पायी प्रवास करत पोलिस स्टेशन गाठले.
 
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या महिलेला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यासाठी या पोलिस स्थानकातून दुसर्‍या स्थानकात चकरा माराव्या लागल्या. त्या पीडित महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
 
तिच्यावर अत्याचार करणार्‍या त्या सहा नराधमांविरुद्ध महिलेने यापूर्वीही पोलिस स्टेशनमध्ये छेडखानीची तक्रार दाखल केली होती मात्र, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती.
 
उलट ते सहा नराधम त्या महिलेला तक्रार मागे घे म्हणत धमकावत होते. पण महिलेने तक्रार मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्या नराधमांनी अपहरण करत तिच्यावर आळीपाळीने 36 तास अत्याचार केला.