बुधवार, 7 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (12:44 IST)

गंभीरचा आदर्श : सुकमा हल्ल्यातील 25 शहीदांच्या मुलांचा खर्च उचलणार

gautam gambhir

सुकमा हल्ल्यातील 25 शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज गौतम गंभीर उचलणार आहे. छत्तीसगडमधील सुकमामध्ये सोमवारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 74 बटालियनच्या 25 सीआरपीएफ जवान शहीद झाले तर 6 जण जखमी झाले आहेत.

“गौतम गंभीर फाऊंडेशन सर्व शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे,” असं सांगितल आहे. केंद्रीय शहरविकास आणि गृहनिर्मा मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी गौतम गंभीरच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. “शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलून गौतम गंभीरने नवा आदर्श समाजापुढे ठेवला. प्रेरणादायी,” असं ट्वीट नायडू यांनी केलं आहे.