1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 17 सप्टेंबर 2023 (17:42 IST)

गाझियाबाद : जिममध्ये ट्रेडमिलवर चालताना 19 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

death
गाझियाबादमध्ये शनिवारी (16 सप्टेंबर) एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. जिममध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना एक 19 वर्षीय तरुण अचानक पडला. काही वेळाने जिम करणारे दोन लोक त्याला बघायला धावले. हे लोक त्याला उठवण्यासाठी त्याच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसले.
 
सिद्धार्थ कुमार सिंग असे मृताचे नाव आहे, तो मुळात बिहारचा असून त्याला सरस्वती विहारमधील जिममध्ये अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो हा मुलगा ट्रेडमिलवर आरामात चालत असताना अचानक खाली कोसळला. त्याचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं समजलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी मृतदेह बिहार येथील त्यांच्या घरी आणला.
 






Edited by - Priya Dixit