1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 सप्टेंबर 2023 (17:18 IST)

धक्कादायक! आईने केली 5 दिवसांच्या चिमुकलीची हत्या

Born Child
आज देश चंद्रावर पोहोचला आहे. मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे वाढत आहे. पण आज देखील काही ठिकाणी मुलगी नको म्हणून मुलीची हत्या करण्यात येते. तिसरे अपत्य नको म्हणून एका आईने आपल्या 5 दिवसांच्या मुलीची हत्या केली. सदर घटना पालघरच्या तारापूरच्या घिवली गावात ही घटना घडली आहे. 
 या महिलेचा पती आणि दोन मुले मुंबईत राहतात तर ही महिला वर्षभरापासून घिवली गावात एकटीच राहते. या महिलेलाआधीपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तिसरे अपत्य नको म्हणून तिने पाच दिवसांच्या चिमुकलीला ठार मारले. 

या महिलेने 30 ऑगस्ट रोजी शासकीय रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. 3 सप्टेंबर रोजी आशा सेविका या महिलेकडे बाळाची चौकशी करण्यासाठी आल्या असता या महिलेने बाळ घरी नसल्याचे सांगितले. नंतर पुन्हा आशा सेविका या महिलेच्या घरी आल्या असत्या बाळ घरी नसल्याचे सांगितले यावर आशा सेविकांना या महिलेवर संशय आला आणि त्यांनी पोलिसांना हे प्रकार सांगितले. पोलिसांनी महिलेची सखोल चौकशी केल्यावर तिने बाळाची हत्या केल्याचे मान्य केले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे. 
 
Edited by - Priya Dixit