शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :पणजी , गुरूवार, 12 जुलै 2018 (12:55 IST)

गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये पीएम मोदी यांच्या नावाची नोंदणी व्हावी, काँग्रेसने पत्र लिहिले

काँग्रेसची गोवा इकाईने बुधवारी गिनीज वर्ल्ड रिकार्ड्सला पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वाधिक विदेशी दौरे करण्याचा रिकॉर्ड नोंदवण्याची मागणी केली आहे.   
 
काँग्रेस नेता संकल्प अमोणकर द्वारा लिहिण्यात आलेल्या या पत्रात म्हटले आहे की, 'आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव सुचवण्यात फारच आनंद होत आहे ज्यांनी चार वर्षाच्या आपल्या कार्यकाळात 41 प्रवास करून विश्व रिकॉर्ड कायम केला आहे.'
 
अमोणकर यांनी म्हटले की मोदी भारताच्या भावी पिढीसाठी रोल मॉडल बनले आहे, कारण कुठल्याही पंतप्रधानांनी आपल्या कार्यकाळात एवढे परदेशी दौरे केलेले नाही आहे.

त्यांनी म्हटले की पीएम मोदी यांनी भारतातील संसाधनांचे योग्य प्रयोग केले आहे आणि 4 वर्षांमध्ये   52 देशांची 41 यात्रा करून रिकॉर्ड बनवला आहे. त्यांनी यासाठी 355 कोटी रुपये खर्च केले आहे.