1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

फी भरली नाही म्हणून 5 तास 59 मुलींना तळघरात ठेवले कैदेत

fee bharli nahi
एक धक्कादायक घटनेत एका शाळेने फी न भरल्यामुळे केजीत शिकणार्‍या 59 मुलींना तळघरात पाच तास कैदेत ठेवले. प्रकरण समोर आल्यावर हंगामा झाला.
 
काही पालकांनी पोलिसांना ही माहिती दिली की मध्य दिल्लीच्या हौज काजी क्षेत्रात शिक्षकांनी 59 मुलींना सकाळी सात वाजेपासून दुपारी 12 पर्यंत कैद ठेवले. पालक शाळेत मुलांना घेण्यासाठी पोहचले तेव्हा हे प्रकरण समोर आले. ज्या खोलीत मुलींना ठेवण्यात आले होते त्याला बाहेरहून कडी लावण्यात आली होती. खोलती पंखाही नव्हता. उष्ण वातावरण आणि भूक, तहान लागल्यामुळे मुलींचे हाल झाले.
 
पालकांनी दार उघडून मुलींना बाहेर काढले. आपल्या पालकांना बघून मुली रडू लागल्या. यावर पालकांनी शाळेत खूप हंगाम केला. दिल्ली पोलिसांनी शाळेहून जुळलेले अधिकार्‍यांविरुद्ध प्रकरण नोंदले असून जवाबदार व्यक्तीचा शोध करत आहे.