रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (09:58 IST)

गांधी कुटुंबीयांसाठी गोवा हे सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण-अमित शहा

"भाजपाने गोव्याचा विकास केला. गांधी परिवारासाठी गोवा फक्त सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण आहे," अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात बोलताना केली. गोवा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी शहा खुद्द गोव्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
 
ते पुढे म्हणाले, "भाजपासाठी गोवा म्हणजे गोल्डन गोवा. पण काँग्रेससाठी गोवा म्हणजे गांधी परिवाराचा गोवा. आम्ही राज्याचं बजेट 432 कोटींहून 2,567 कोटींवर आणलं आहे."

"माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याच्या विकासासाठी काहीही केलं नाही. भाजपाने मात्र दिलेला शब्द पाळला. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामाचं कौतुकही केलं. ते म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री सावंतजी, मनोहर पर्रिकरांच्या गोल्डन गोव्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत", असं शहा म्हणाले.

"गोव्यातला लसीकरणाचा वेग देशात सर्वाधिक आहे. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात सर्वाधिक वेगाने 100 टक्के लसीकरणाचं लक्ष गाठण्यात गोवा यशस्वी ठरला आहे", असं शहा म्हणाले