सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2019 (09:41 IST)

देवालाही फॅन, कुलरची थंडगार हवा

देशभरात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. या उन्हाच्या झळा जशा लोकांना असह्‍य होत आहेत, तशाच त्‍या देवालाही जाणवू लागल्‍याचे चित्र आहे. याला कारण उत्‍तर प्रदेशच्या मंदिरांमध्ये पुजार्‍यांकडून गाभार्‍यात कुलर, फॅनची खास व्यवस्‍था करण्यात आली आहे. उत्‍तर प्रदेशच्या कानपूरमध्ये अनेक मंदिरांमध्ये पुजार्‍यांनी आपल्‍या लाडक्‍या देवाला उन्हाळ्‍याचा त्रास होउ नये यासाठी गाभार्‍यात कुलर आणि फॅनची व्यवस्‍था केली आहे. त्‍यामुळे आता भक्‍तांप्रमाणेच देवही आपल्‍या गाभार्‍यामध्ये फॅन आणि कुलरच्या थंडगार हवेत राहणार आहे. इतकेच नाही तर उन्हाळ्‍याच्या पार्श्वभूमीवर देवाधिकांच्या मुर्तींना हलके सुती कपडे घालण्यात येत आहेत.