मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (20:08 IST)

मजुरांसाठी खुशखबर! आता एकाच छताखाली मिळणार सरकारी योजनांचा लाभ , कारण .....

narendra modi
केंद्र सरकारनं मजुरांसाठी खास ओळखपत्र बनवण्याची घोषणा केली आहे. कामगारांसाठी हे कार्ड गेम चेंजर ठरणार आहे. त्याच्या मदतीनं, ते सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या विविध योजनांचा लाभ सहज मिळवू शकणार आहेत. तसेच कंत्राटदारांवरही अंकुश ठेवण्याचे काम करतील.
 
केंद्र सरकार गरीब, मजूर आणि शेतकरी यांच्या फायद्यासाठी सतत योजना आणते. परंतु अनेक वेळा त्यांचे खरे फायदे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. हा विशेष आयडी त्यांच्यासाठी एक शस्त्र म्हणून काम करेल आणि बांधकाम कामात गुंतलेल्या स्थलांतरित मजुरांना त्याचा विशेष फायदा होईल.
 
कामगारांच्या कल्याणासाठी केलेले किमान वेतन, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, लहान मुलांसाठी स्वच्छतागृहे आणि क्रॅच इत्यादी कायद्यांचे कंत्राटदारांकडून फारसे पालन केले जात नाही. त्यामुळं ही नवीन कार्डे बनवून सरकार त्यांना विविध योजनांच्या कक्षेत आणणार आहे. तसेच अशा मजुरांचे कोणत्याही प्रकारे शोषण होणार नाही. हे विशेष कार्ड बनवल्यानंतर कंत्राटदारांना शासनाचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor