शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 (08:45 IST)

फ्लाइटला मिळणाऱ्या बॉम्बच्या धमकीच्या खोट्या कॉलवर सरकारने सुरू केली कारवाई

एका वरिष्ठ अधिकारींनी सांगितले की सरकारने मेटा आणि एक्सला या खोट्या कॉल आणि संदेशांशी संबंधित डेटा सामायिक करण्याची विनंती केली आहे. तसेच या कंपन्यांना सहकार्य करावे लागेल, कारण ही बाब जनतेच्या व्यापक हिताची आहे, असेही ते म्हणाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार खोट्या बॉम्बच्या धमकीचे कॉल्स आणि मेसेजची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने या कटामागील लोकांचा शोध घेण्यासाठी कारवाई सुरू केली. तसेच सरकारने मेटा आणि एक्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अशा कॉल आणि संदेशांबद्दल माहिती सामायिक करण्याची विनंती केली आहे.
 
 सरकार म्हणाले की, हे बनावट कॉल लोकांसाठी धोकादायक असून आणि त्यामुळे त्यांना ओळखण्यासाठी बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्यांकडूनही सहकार्य मागवण्यात आले आहे. काही लोकांची ओळख पटली आहे जे विमानांना लक्ष्य करून बॉम्ब ठेवण्यासाठी खोटे कॉल करत होते आणि या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जात आहे. पण, हे खोटे कॉल्स आणि मेसेज कुठून आले आणि त्यामागे कोण आहे, हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. तसेच एका वरिष्ठ अधिकारींनी सांगितले की, सरकारने मेटा आणि एक्सला या खोट्या कॉल्स आणि संदेशांशी संबंधित डेटा शेअर करण्याची विनंती केली आहे. या कंपन्यांना सहकार्य करावे लागेल, कारण ही बाब जनतेच्या व्यापक हिताची आहे, असेही ते म्हणाले.