विचित्र: नातवाला कोरोनाव्हायरसपासून वाचविण्यासाठी आजी- आजोबांनी केली आत्महत्या
कोटा (राजस्थान)- जिल्ह्यात रविवारी कोरोना व्हायरस संक्रमित व्यस्कर दंपतीने कथितपणे चालत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली, कारण त्यांना भीती होती की त्यांच्यामुळे त्यांच्या नातवाला आणि सुनेला संसर्ग पसरू नये.
पोलिसांनी सांगितले की हीरालाल बैरवा (75) आणि त्यांची पत्नी शांतिबाई (70) आपल्या 18 वर्षाच्या नातू आणि सुनेसोबत शहरातील पुरोहितजी की टपरी भागात राहत होते. त्यांच्या मुलाची आठ वर्षापूर्वीचं निधन झालं. रेल्वे कॉलोनी ठाण्याच्या उपनिरीक्षक रमेश चंद शर्मा यांनी सांगितले की वृद्ध दंपती 29 एप्रिलला संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यापासून विलगीकरणात होते.
दोघांनी रविवारी सकाळी चंबल ओव्हरब्रिजच्या जवळ रेल्वे लाइन देहली-मुंबई अप ट्रॅकवर ट्रेनसमोर उडी घेतली. हे प्रकरण दाखल करुन पोलिस पुढील कारवाई करत आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट मिळालेले नाही.