गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (12:41 IST)

अंबानींच्या घरी लग्नाची शानदार तयारी

anant ambani
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड व्हायरल झाल्यानंतर, चाहते वर्षातील भव्य लग्न पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. लग्नाला  15 दिवस उरले आहे. अंबानींच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची यादी तयार झाली आहे. या यादीत जगभरातील या बड्या व्यक्तींचा समावेश आहे.रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी 12 जुलै रोजी मुंबईत होणार आहे. मुंबईतील अल्तामो अनंत रोडवरील एनटिलिया या बहुमजली अंबानी निवासस्थानी एका समारंभात हे लग्न होणार आहे. जामनगरमधील रिलायन्स ग्रीन्स कॉम्प्लेक्समध्ये 1-3 मार्च या कालावधीत लग्नापूर्वीचे उत्सव आयोजित केले जातील,
 
हे पाहुणे येणार आहे. 
जागतिक व्यावसायिक वर्गात मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, सीईओ मार्क झुकरबर्ग, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष स्टीफन श्वार्झ, डिस्नेचे सीईओ बॉब इगर, इव्हान के ट्रम्प, मॉर्गन स्टॅनलेचे सीईओ टेड पिक, थॉमस मोयनिहानसह बँक ऑफ अमेरिकाचे सीईओ ब्रायन यांचा समावेश आहे. कतारचे प्रीमियर मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जस्सिम अल थानी, ॲडनो सुलतानचे सीईओ अह मेद अल जाबेर, ईएल रॉथस्चाइल्डचे अध्यक्ष लिन फॉय रेस्टोर डी रोथस्चाइल्ड, भूतानचे राजा आणि राणी, टेक उद्योजक युरी मिलनर आणि ॲडोबचे सीईओ उपस्थित राहणार आहेत.
 
 Edited by - Priya Dixit