रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मे 2022 (15:54 IST)

मित्रांसोबत वरातीत नाचताना नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लग्न हे देवाने बांधलेली गाठ आहे. लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो. लग्नानंतर प्रत्येक जोडपं आपल्या नव्या आयुष्यात पाऊल टाकण्यासाठी सज्ज असतात. लग्नाच्या दरम्यान अशा काही आठवणी असतात ज्या आयुष्यभरासाठी लक्षात राहतात. लग्नाच्या दरम्यान समारंभात अशा काही घटना देखील घडतात ज्या नेहमीसाठी आठवणीत राहतात. लग्न समारंभाला आनंददायी करण्यासाठी नवीन जोडपं सर्व काही करतात. मात्र कधी कधी या आनंदाच्या क्षणात विरजण पडते. असेच काहीसे घडले आहे गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील मांडवी तालुक्यातील अरेथ गावात. लग्न घटिका जवळ येण्यापूर्वी नवरदेवाची वरात निघताना डीजेच्या तालावर नवरदेव आपल्या मित्रांसोबत नाचत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता त्यापूर्वीच त्याची प्राण ज्योत मावळली.  
 
सुरतच्या मांडवी तालुक्यातील अरेथ गावात मितेश भाई चौधरी(33) याची वरात भालोद तालुक्यात धामांडळा गावात जाणार होती त्यापूर्वी लग्नाचे विधी करण्यात आले. वरात निघण्यापूर्वी डीजेवर नाचण्याचा कार्यक्रम झाला त्यात नवरदेवाने देखील मित्रांसोबत नाचण्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शविली आणि तो आपल्या मित्राच्या खांद्यावर बसून नाचत असताना एकाएकी त्याच्या छातीत दुखू लागले त्याला तातडीने दुचाकीवरून रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्याला उपचार मिळाला नाही म्हणून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले असता त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबातील आनंदाचे क्षण शोककळात पसरले.