1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2023 (19:50 IST)

गुजरात : 14 वर्षीय देवांशचा हार्ट अटॅकने मृत्यू

अलीकडील काही दिवसांत हार्ट अटॅक ने मृत्यू होण्याचा प्रमाणात वाढ झाली आहे. गुजरात मधून एक हृदय द्रावक घटना घडली आहे. गुजरात मधील एका अल्पवयीन मुलाचा हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाल्यामुळे संपूर्ण देश हादरलं आहे. देवांश भयानी असे या मयत मुलाचे नाव आहे. 
 
राजकोट जिल्ह्यातील गोंडल येथील स्वामी नारायण गुरुकुलमधील मयत देवांश ने  हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच वडिलांना एक छायाचित्र पाठवले होते. गुरुपौर्णिमेला जो कार्यक्रम सादर करणार होता, त्याला वडिलांनी शुभेच्छा लिहून देवांशला प्रोत्साहन दिले होते. गुरुपौर्णिमा कार्यक्रमात देवांशला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने गोंधळ उडाला. मध्यंतरी कार्यक्रम थांबवून विद्यार्थ्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.वैद्यकीय तपासणीत विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओ मध्ये देवांश कार्यक्रमाच्या मध्ये अचानक स्टेजवर कोसळतो त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. त्याचे शव विच्छेदन केले असता त्यात देवांश पूर्वी पासून HOTC या हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्तअसल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.  
 
Edited by - Priya Dixit