रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (17:21 IST)

देशभक्तीवर गीत गाणाऱ्या एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला, खुर्चीवरून पडून प्राण गमावले

Lady Death
गुजरातमधून एक मोठे प्रकरण समोर आले आहे. एका कार्यक्रमात देशभक्तीपर गीत गाणाऱ्या एका महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खुर्चीवरून जमिनीवर पडल्या. स्थानिक लोकांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
ही घटना कच्छ जिल्ह्यातील भुज शहरातील प्रमुच्छस्वामी नगरमध्ये घडली. येथे वृक्ष मित्र संस्थेने देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तिथे आरती बेन राठोड नावाची महिला खुर्चीवर बसून गाणी म्हणत होती. गाणे म्हणत असताना त्या खुर्चीवरून खाली पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
आरती बेन खुर्चीवरून पडताच लोकांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली आणि नंतर त्यांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी काही लोकांनी त्यांच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ बनवला, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये महिला खुर्चीवरून खाली पडताना दिसत आहे.
 
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला
या प्रकरणात डॉक्टरांनी सांगितले की महिलेला हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. खुर्चीवर बसून महिलेचा अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काहींना स्टेज शोदरम्यान तर काहींना डान्स करताना हृदयविकाराचा झटका आला.