सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (11:36 IST)

हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या

murder
हरियाणा इंडियन नॅशनल लोक दल चे अध्यक्ष आणि माजी आमदार  नफे सिंग राठी यांची रविवारी संध्याकाळी झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या सोबत असणाऱ्या दोंघाच्या मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. 

हल्लेखोरांनी गोळीबार केला त्यावेळी राठी आणि त्याचे साथीदार गाडीच्या आत होते घटनेनंतर मारेकरी पळून गेले. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यापूर्वीच राठी यांना मृत घोषित केले. 
नफे सिंग राठी हे बहादूरगडमधून INLD चे आमदार होते. या हल्ल्यांनंतर राज्य पोलीस सतर्क झाले आहे. अनेक पथके घटनास्थळी रवाना झाले पोलीस सतर्क झाले आहे. घटनास्थळीचे पुरावे गोळा करण्यात आले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज बघत आहे. 

संपत्तीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. राठी हे विधानसभेत दोनदा आमदार राहिले आहे. ते हरियाणाचे माजी आमदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांचा राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग होता. 

रविवारी सायंकाळी संखोल बहादूरगढजवळील बाराही रोड रेल्वे गेटजवळ हा हल्ला झाला. नाफे सिंग त्याच्या साथीदारांसह कारमधून बाराही गावातून परतत असल्याचे सांगण्यात आले. एका कौटुंबिक सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते तेथे गेले होते.
 
संखोलजवळील रेल्वे फाटकावर अज्ञात हल्लेखोरांनी वाहनात बसलेल्या नाफेसिंग राठी आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार सुरू केला. नफे सिंग कारच्या पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. या हल्ल्यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर आय-20 कारमधून आले होते.त्यांच्यावर 50 हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.असे पोलिसांनी सांगितले 
 
Edited by - Priya Dixit