सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (13:46 IST)

Nagpur : पत्नीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रमच्या दिवशी पतीची हत्या

murder knief
पत्नीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी शेजारच्यांनी पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जाटतरोडी भागात घडली आहे. 
 
किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादी मुळे चाकू भोसकून हत्या केल्याची घटना घडलाय आहे. महेश बावणे असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. शेरू राठोड असे आरोपीचे नाव आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, बायकोच्या डोहाळजेवणाच्या दिवशी घरी मेहंदी काढायला आलेल्या मुलीच्या आईचा आरोपी कडून घेतलेले पैसे का परत देत नाही म्हणून वाद झाला आणि याच वेळी मयत महेश बावणे आणि आरोपी शेरू राठोड आणि रितिक राठोड यांच्यात बाचाबाची झाली मयत महेश कडून आरोपींची समजून घालत असताना आरोपीने महेशची चाकू भोसकून निर्घृण हत्या केली. 

घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन आरोपी शेरू राठोडला अटक केली आहे तर त्याचा मुलगा रितिक राठोड हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 
 
बायकोच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी पतीची निर्घृण हत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  
 
 Edited by - Priya Dixit