1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (15:54 IST)

हळदी कुंकूच्या कार्यक्रमात नवनीत राणांचा नवीन उखाणा

navneet rana
अमरावतीच्या तिवसा येथे राणा दाम्पत्यानं सामूहिक हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता. या समारंभात नवनीत राणा यांनी रवी राणासाठी एक नवीन उखाणा घेतला. 

नागपुरात भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण- पश्चिम मंडल कडून विकासाचे वाण हळदी-कुंकू  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राणा दाम्पत्याने तसेच उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अमृता फडणवीस यांनी महिलांशी संवाद साधला आणि उखाणा घेतला .

या वेळी खासदार नवनीत राणा यांनी देखील रवी राणांसाठी उखाणा घेतला ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. 37 जोडप्यात सामूहिक विवाह सोहळ्यात झाले माझे लग्न, आणि लग्नात आणला होता बॅंडवाला .रवीजींचं  नाव घेते झुकेगा नहीं मैं साला. . या त्यांच्या नवीन उखाण्याची सर्वत्र चर्चा होत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit