शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (14:45 IST)

Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

Navneet Rana
Navneet Rana Threatened: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी त्यांना फोन वरून देण्यात आली आहे. त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा तपास सुरु केला आहे. 

खासदार नवनीत राणा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, गेल्या 4 -5 दिवसांपासून त्यांना विठ्ठल नावाच्या माणसाचा कॉल येत असून त्याने मी तिवसा येथून बोलत आहे. मी तुला वर्दळीच्या ठिकाणी धारदार चाकूने ठार मारेन अशी धमकी दिली. तसेच तो फोन वरून अश्लील शिवीगाळ देत होता. 

त्या व्यक्तीचा तातडीनं शोध काढून त्याला ताब्यात घेण्याची मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. त्या व्यक्तीचा ताबडतोब शोध घेऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार खासदार नवनीत राणा यांच्याकडून त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दिली असून पोलीस धमकी देणाऱ्याच्या शोधात आहे.गेल्‍या वर्षीदेखील हनुमान चालिसा पठण केल्‍यास तुम्‍हाला ठार मारू, अशी धमकी नवनीत राणा यांना देण्‍यात आली होती. या प्रकरणी राणांनी नवी दिल्‍ली येथील नॉर्थ अव्‍हेन्‍यू पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली होती.आता पुन्हा  या धमकीमुळे खळबळ उडाली  आहे. 
 
 Edited by - Priya Dixit