मुंबईसह सात राज्यांत हाय अलर्ट जारी
पाकिस्तान भारतात घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना हाय अलर्टचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या बैठकीत मुंबई हाय अलर्टवर असल्याचे जारी करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन मुंबईतील सुरक्षा यंत्रणेला अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. पोलीस महासंचालकांसह अनेक पोलीस अधिकारी या बैठकीस हजर होते. प्रामुख्यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह सात राज्यांत हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळेच खासकरून मुंबईतील रेल्वे, विमानतळ आणि शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील स्थळांवरील गस्त वाढवली आहे. याचबरोबर प्रत्येक नागरिकाने देखील सतर्क राहून आजूबाजूला काही अज्ञात वस्तू आढळून आल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी.