बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (16:11 IST)

#HTLS2017 : माझ्या जवळ क्रेडिट कार्ड देखील नाही आहे - मुकेश अंबानी

रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमॅन मुकेश अंबानी एचटी लीडरशिप समिटला  संबोधित करत आहे.

CanDoचे सीईओ डॉ रोला हलम यांनी म्हटले की भारताला सिरीया क्रायसिसला इग्नोर नाही करायला पाहिजे. त्यांनी म्हटले की ''जेव्हा आमचे दवाखाने नष्ट करण्यात येतात, डॉक्टर्स आणि नर्सेसला टॉर्चर केले जाते हे तर हे या गोष्टीचे संकेत आहे की हे सर्व तुमच्या दवाखान्यासोबत देखील होऊ शकत."
 
मुकेश अंबानी म्हणाले की येणार्‍या दिवसांमध्ये भारत नंबर 1 स्टार्टअप देश बनेल.  
 
कृषी, शिक्षा आणि आरोग्य सेवा मूलभूत क्षेत्र आहे ज्यांच्यावर फोकस करून देश प्रगती करू शकतो.  
 
मुकेश अंबानी यांनी म्हटले, ''मी डिजीटल क्रांतीचा फार मोठा समर्थक आहे, पण महत्त्वाची बाब अशी आहे की माझ्याजवळ अद्याप क्रेडिट कार्ड देखील नाही आहे." त्यांनी सांगितले की त्यांची आवड वाचण्यात आहे. नुकतेच त्यांनी लियोनार्डो द विंचीचे एक पुस्तक वाचले आहे.  
 
रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमॅन यांनी सांगितले की विकासाच्या बाबतीत भारत चीनपेक्षा पुढे जाऊ शकत.  
 
मुकेश अंबानी यांनी म्हटले की विकासासाठी आधुनिक उपकरणांचा वापर गरजेचा आहे. 
 
आधार जगातील सर्वात मोठा आणि सर्वात आधुनिक बायोमैट्रिक सिस्टम आहे. याला काहीच वर्षांमध्ये तयार करण्यात आले आहे. हे अमेरिका आणि चीन सारख्या देशांपेक्षा पुढचे विचार आहे - मुकेश अंबानी 
 
मुकेश अंबानींना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला की देशाच्या इकॉनॉमीवर तुमचा एवढा प्रभाव आहे आणि तुम्ही याला चांगल्या प्रकारे समजता तर तुम्ही देशाचे अर्थ वित्त मंत्री का बनत नाही ? या वर त्यांनी म्हटले की मी बिझनेसच्या जगातून येत असून राजकारणात माझे कुठले ही दखल नाही आहे.  
 
आपल्या स्पीचच्या शेवटी त्यांनी देश आणि जगातील गुंतवणूकदारांना भारताच्या ग्रोथ स्टोरीचा भाग बनण्याचे आव्हान केले. त्यांनी म्हटले की येणार्‍या तीस वर्षांमध्ये भारताला स्वतंत्र होऊन 100 वर्ष पूर्ण होतील. आम्हाला असे वाटत आहे की आम्ही जगातील सर्वात प्रगतिशील देश म्हणून ओळखण्यात येऊ. या प्रसंगी लोकांच्या आरोग्यासाठी हेल्थकेयर सिस्टमला सोपे करण्याची अपील केली. त्यांनी म्हटले की 1.3 अरब भारतीयांना देशाच्या प्रगतीसाठी आपसात एकत्र येऊन संकल्प घ्यायला पाहिजे - मुकेश अंबानी
 
भारतात ज्या प्रकारे आर्थिक आणि तांत्रिकी बदल होत आहे ते एका प्रकारे सिविलायझेशनल रि-बर्थ आहे. येणारे दिवस भारत आणि चीनचे आहे. तस तरं भारत ग्रोथच्या बाबतीत चीनपेक्षा पुढे आहे. नवीन टेक्नॉलॉजीच पुढची प्रगती निश्चित करेल. येणार्‍या वर्षांमध्ये भारताची ग्रोथ कायम राहणार आहे - मुकेश अंबानी