सुन्न करणारी घटना: खोलीत रक्ताने माखलेले धड आणि डोकं फ्रिजमध्ये; २५ वर्षीय पत्नीची पतीने केली निघृण हत्या
गुवाहाटीच्या बेल्टोला भागातील एका घरातून एका महिलेचा धडापासून वेगळा केलेला आणि कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. तिचे धडापासून वेगळे केलेले डोके एका प्लास्टिक पिशवीत गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. ही हत्या २४ ते ४८ तासांपूर्वी झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गुवाहाटीच्या बेल्टोला भागातील एका घरातून एका महिलेचा धडापासून वेगळा केलेला आणि अंशतः कुजलेला मृतदेह सापडला. त्याच वेळी, प्लास्टिक पिशवीत गुंडाळलेले तिचे डोके फ्रीजमध्ये आढळून आले. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.
पोलिसांना याची माहिती कशी मिळाली?
मृत महिला, रिया तालुकदार, एका बुटीकमध्ये काम करत होती आणि तिचा पती कॅब चालक होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी रात्री शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती; त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना जमिनीवर धडापासून वेगळा केलेला मृतदेह व फ्रीजमध्ये कापलेले डोके आढळले.
पोलीस अधिकाऱ्याने काय सांगितले?
पोलीस अधिकारी म्हणाले, "ही हत्या २४ ते ४८ तासांपूर्वी झाली असावी, कारण मृतदेह कुजू लागला होता. धडापासून वेगळे केलेले डोके फ्रीजमधील एका पॉलिथिन पिशवीत सापडले." या प्रकरणातील मुख्य संशयित मानल्या जाणाऱ्या पतीने पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याचे समजते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.
