रविवार, 27 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बायको फोनवर बोलत होती, नाराज पतीने गरम लोखंडी रॉडने तिचा प्रायव्हेट पार्ट जाळला

एका धक्कादायक प्रकरणात पत्नी मोबाइलवर बोलत असल्याची शिक्षा म्हणून नवर्‍याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गरम लोखंडी रॉड लावली. हे हैराण करणारे प्रकरण झारखंडच्या देवघर येथील आहे. 7 मे रोजी असहद अंसारीची पत्नी फोनवर बोलत होती. फोनवर पत्नीला बोलताना बघून तिचा नवरा आणि सासरचे अचानक हैवान झाले.
 
रागात पती असहद आणि सासू- सासर्‍याने आधीतर तिच्यावर मारहाण केली. रश्शीने तिचे हात-पाय बांधले आणि नंतर लोखंडी रॉड गरम करून तिच्या शरीरावर जखमा दिल्या आणि प्रायव्हेट पार्ट्सवर देखील जखमा दिला. एवढेच नव्हे तर शारीरिक छळ झाल्यामुळे ती ओरडू लागली तर तिच्या तोंडात कपडा फसवून दिला.
 
या प्रकरणात महिलेने 12 मे रोजी आपल्या वडिलांसोबत जाऊन पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली. रिपोर्टप्रमाणे 2011 साली महिलेचा विवाह मटकिया येथे राहणार्‍या गुलाम रसूलच्या मुलाशी म्हणजे असहद अंसारीसोबत झाले होते.
 
महिलेने आरोप केला की लग्नानंतर तिचा नवरा, सासू, सासरे आणि दीर अनेकदा यातना देत होते आणि मारहाण करायचे. 7 मे रोजी तर सर्व मर्यादा ओलांडून घरच्यांनी तिला खोलीत कोंडून दिले आणि ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही अशी धमकी दिली. पोलिस प्रकरणाची चौकशी करत आहे.