बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 जानेवारी 2019 (10:34 IST)

मुंबईकरांच्या मदतीला खासगी बस आणि स्कूल बस

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरु आहे. तोडग्यासाठी दोन दिवसांची मुदत देत मुख्य सचिवांना बैठक घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने मुंबई हायकोर्टात देण्यात आली. आता सोमवारी याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.
 
दरम्यान, बेस्टच्या संपानं त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण खासगी बस आणि स्कूल बस आजपासून प्रवासी वाहतूक करणार आहेत. या दोन्ही बस संघटनांच्या महासंघानं हा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन हजार खासगी आणि स्कूल बस मुंबईकरांच्या सेवेत असणार आहेत. 10 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी 20 रुपये तिकीट, तर त्यापेक्षा जास्त प्रवासासाठी बेस्टच्या दरानुसार तिकिट आकारणार आहे. अपंग आणि जेष्ठ नागरिकांना मात्र मोफत प्रवास असणार आहे.