दिल्लीत इस्रायलच्या दूतावासाबाहेर IED स्फोट
दिल्लीतील इस्रायलच्या दूतावासाबाहेर IED स्फोट झाला. स्फोटाच्या ठिकाणी असलेल्या तीन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाल्याची माहितीही दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
दिल्लीतील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रोडवर इस्रायल या देशाचा दूतावास आहे. या दूतावासापासून 150 मीटरवर हा स्फोट झाला.
या स्फोटात इस्राईलच्या दूतावासाचं कोणतंही नुकसान झाली नाही, अशी माहिती इस्राईलचे परराष्ट्रमंत्री गाबी अशकेनाजी यांनी दिली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्याचे आदेश त्यांनी दिलेत.
ANI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, "इस्रायलच्या दूतावासाबाहेर कमी तीव्रतेचा स्फोट झाला असून, स्फोटाचं कारण शोधलं जात आहे. घटनास्थळी काचेचे तुकडे पडलेले असून, या घटनेत कुठल्याही जीवितहानीची माहिती अद्याप समोर आली नाही."