रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (12:02 IST)

दिल्लीतील हिंसाचारावर राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरूवात झाली प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचं सांगत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नाराजी व्यक्त केली.
 
 
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत राष्ट्रपती यांनी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचं कौतूक करत कृषी कायदे फायद्याचे असल्याचं सांगितलं.
 
राष्ट्रपतींनी कोरोना आणि इतर संकटांचा उल्लेख करत केंद्र सरकारनं योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचल्याचं म्हटले.
 
कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही राष्ट्रपतींनी भाष्य करत म्हटले की या कृषी सुधारणांचा फायदा १० कोटी पेक्षा जास्त छोट्या शेतकऱ्यांना तात्काळ मिळणं सुरू झालं आहे. फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी सुधारणांना पाठिंबा दिला होता. तसेच  सध्या या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असं राष्ट्रपती म्हणाले.