रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 जुलै 2018 (17:00 IST)

महत्वाचा निर्णय : आता नीट, जेईईची परीक्षा वर्षातून दोनदा

नीट आणि जेईईची परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली आहे. ही परीक्षा सीबीएसईऐवजी राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परिक्षेच्या धर्तीवर ही परीक्षा घेण्याची शिफारस करण्यात आली होती जी मान्य करण्यात आली आहे.१२ च्या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये आणि सगळ्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई तसेच नीटच्या पेपरचा स्तर एकसमान असावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे जेईईच्या परीक्षा जानेवारी आणि एप्रिलमध्ये होणार आहेत तर नीटच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात होणार आहेत.