बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बिहार: प्राचार्यासह 18 जणांनी केला विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

बिहारमध्ये 10 वी च्या विद्यार्थिनीवर शाळेतील मुख्यध्यापक, 2 शिक्षक आणि 15 विद्यार्थ्यांनी शाळेतच सामूहिक बलात्कार केला. विद्यार्थिंनीच्या तक्रारीवर पोलिसांनी 4 जणांना अटक केली ज्यात प्राचार्य, 2 विद्यार्थी आणि 1 शिक्षक सामील आहे.
 
अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की तिला ब्लॅकमेल करत वारंवार तिच्यावर बलात्कार केला गेला. पोलिसांनी या मुलीच्या तक्रारीच्या आधारे 18 जणांनावर सामूहिक बलात्कार करण्याचे प्रकरण नोंदवले आहे.
 
छपरा जिल्ह्यातील परसागढ गावातील दिपेश्वर बाल ग्यान निकेतन शाळेत दहावीत शिकणारी ही विद्यार्थिनी तक्रारीत सांगितले की डिसेंबर 2017 मध्ये तिच्यासोबत तिच्या वर्गातील एका मुलाने तिच्यावर बलात्कार केला. आणि व्हिडिओ देखील काढला. नंतर तिला ब्लॅकमेल करत आणखी चौदा मित्रांनी तिचे शोषण केले.
 
त्या विद्यार्थिनीने शाळेचे मुख्यध्यापक उदय कुमार उर्फ मुकुंद सिंग यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर आरोपी मुलांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनी व शाळेतील दोन शिक्षकांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुणालाही सांगितले तर तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
 
सात महिन्यांपासून मुलांकडून व शिक्षकांकडून सतत होणाऱ्या बलात्कारांमुळे पीडित मुलीने अखेर हिंमत एकवटून एकमाथाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदविली.