रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ड्रग्स घेतात राहुल गांधी, डोप टेस्टमध्ये होतील फेल: सुब्रमण्यम स्वामी

वरिष्ठ भाजप नेता आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एका वादग्रस्त वक्तव्यात दावा केला की काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ड्रग्स घेतात. त्यांनी म्हटले की राहुल यांचा डोप टेस्ट केल्यावर त्यात ते फेल होतील.
 
न्यूज एजन्सी ANI ने सुब्रमण्यम स्वामी यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात त्यांनी राहुलवर निशाणा साधला आहे. स्वामी यांनी म्हटले की राहुल गांधी कोकेन वापरतात. 
 
उल्लेखनीय आहे की पंजाब सरकारने नवीन भरतीसाठी आणि दरवर्षी होणार्‍या प्रमोशनसाठी कर्मचार्‍यांचे डोप टेस्ट करवण्या संबंधी नियम बनवण्यासाठी नोटिफिकेशन जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर टिप्पणी करत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी म्हटले होते की 70 टक्के पंजाबी लोकांना नशेडी म्हणणार्‍यांनी स्वत: डोप टेस्टला समोरा जावं.