शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जून 2018 (09:02 IST)

वाजपेयी रुग्णालयात सर्वात आधी हे गांधी पोहोचले

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे रुग्णालयात दाखल झाले. मात्र यांना बघण्यासाठी भाजपा किंवा संघातील नव्हे तर एक गांधी सर्वात आधी पोहचले आहेत. वाजपेयी यांना  सकाळी अचानक ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘डायलिसिस’करण्यात आल्यानंतर त्यांना ‘आयसीयू’मध्ये ठेवण्यात आले आहे. तर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच भाजप नेत्यांच्याही आधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘एम्स’कडे धाव घेतली. मग कोठे भाजप नेत्यांची रुग्णालयात रांग  लागली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, भाजप अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन आदी नेत्यांनी ‘एम्स’मध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.