सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जून 2018 (09:00 IST)

तयार रहा हे आहे ११ वी चे प्रवेश वेळापत्रक

दहावी पास झालेल्या विद्यार्थी वर्गाला वेध लागतात ते पुढील शिक्षणाचे. तेच वेळापत्रक शिक्षक विभागाने अजाहीर केले असून १३ जून पासून ऑनलाईन प्रवेश सुरु केले आहे. 13 ते 25 जून दरम्यान कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे ऑनलाईन अर्ज विद्यार्थी वर्गाला भरावे लागणार  आहेत. यामध्ये किमान चार फेऱ्या होतील आणि प्रथम यादी जाहीर होतील अर्थात ती मेरीट लिस्ट असेल. सुरवातीला 13 ते 18 जून - द्विलक्षी (बायफोकल) विषयांचे ऑप्शन/पसंती क्रमांक भरणे (कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखांचे) अर्ज भरणे सुरु होणार आहे. तर 13 ते 25 जून - इतर सर्व शाखांचे (कला, वाणिज्य, विज्ञान) अर्ज भरणे सुरु होणार आहे. या प्रक्रियेतील  21 जून - सकाळी 11 वाजता - बायफोकल/द्विलक्षी विषयांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तर  28 जून - सकाळी 11 वाजता -बायफोकल/द्विलक्षी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.  पुन्हा सर्व हरकती दूर करत 5 जुलै - सकळी 11 वाजता - पहिली गुणवता यादी जाहीर होणार आहे. रिक्त जागांचा तपशील आणि पहिली फेरीची कट ऑफ प्रसिद्ध करणे  हे होताच 13 जुलै - दुपारी 4 वाजता- दुसरी नियमित गुणवता यादी जाहीर करण्यात येणार आहे. ही  प्रक्रिया अशीच पुढे सुरु ठेवत 23 जुलै 11 वाजता - तिसरी नियमित गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. तर सर्व सुरळीत पार पडले तर  29 जुलै - सकळी 11 वाजता - चौथी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.