बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

भारतातील हा आहे वयोवृद्ध वृक्ष

छत्तीसगडच्या कोरबा भागातील बाल्को वनक्षेत्रात वनविभागाला देशातील सर्वात जुना वृक्ष आढळला असून साल जातीच्या या झाडाचे वय 1400 वर्षे असल्याचे परीक्षणात सिद्ध झाले आहे. वैज्ञानिकांनी या वृक्षाच्या आतील रिंगची तपासणी करून त्याचे वय निश्चित केले गेले आहे. हा वृक्ष जगातील सर्वात जुन्या वृक्षातील एक असेल असे सांगितले जात आहे. स्थानिक लोक आणि आदिवासी या हा महावृक्षाला देव मानतात. अेरिकेच्या लॅबॉरेटरी ऑफ ट्री रिंग रिसर्च संस्था हे काम करते. या संस्थेने जगातील सर्वात जुना म्हणून व्हाईट माउंट ग्रेट बेसिन मधील ब्रिसलकोण पाईन वृक्षाची नोंद केली असून त्याचे वय 5067 वर्षे निश्चित केले आहे. दुसर्‍या नंबरवर चिली मधील वृक्ष असून तीन नंबरवर सध्या 1075 वर्षे जुना बोस्नियन पाईन वृक्ष असून त्याची जागा आपला साल वृक्ष घेईल असे सांगितले जात आहे. हा वृक्ष 28 मीटर उंच असून त्याच्या खोडाची जाडी 28 इंच आहे.